Categories
Uncategorized

Local Inspiration#4 -आई…

माझा 2 वर्षाचा मुलगा,मी आल्यावर पळत आला. जोरात मिठी मारली,आणि हसत हसत रडु लागला. तीन-चार तास झाले तरी कुठे जाऊ देईना,सारखे आपले मागे मागे दुद्दुड चालूच होती त्याची.त्याला अजून नीटस बोलत येत नाही.काय होतंय ते नीट सांगता येत नाही. पण तो सगळ्यांना सांगत होता की त्याची मम्मा आलीये म्हणून.सगळ्यांचे डोळे पाण्याने आपोआप ओले झाले होते.

कस,आहे वो हे नातं,कळतच नाही.पृथ्वीवरच सगळयात निर्स्वार्थी आणि प्रेमळ नात आहे.ज्याच्या जवळ आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे,त्याला खरच कशाची गरज नाही लागत. ज्यावेळी पण वाईट दिवस येतात ना त्यावेळेस खंबीर आधार म्हणजे आई असते राव!

त्याची अवस्था पाहून अशा कितीतरी आई आहेत ,आज कोविड 19 मध्ये आपल्या पिलांना घरी ठेवून काम करतात.इच्छा असून त्यांना भेटू शकत नाही,त्यांच्या सोबत वेळ घालवू नाही शकतं. कशी परिस्थिती आणून ठेवलीय ना कोरोना ने ,सगळ्यांनाच वाईट परिस्थिती तून जावे लागतंय. सगळे जण आतुरतेने वाट पहातायेत कधी हे दिवस संपणार आणि पुन्हा पहिल्यासारखा होणार. दिवस आठवले की सुन्न होयला होतंय,अपोआप डोळे भरून होतात.

असो,त्या सगळ्या आई च, ज्या त्यांच्या पिल्लं घरी ठेवून काम कार्यरत आहेत त्यांच्यासाठी खरच खूप खूप कौतुक आहे. ही वेळ लवकर निघून जावी एवढच वाटते मला. काय लिहावं हेच कळेना झालाय मला,फक्त ना छोट्याचा आनंद मला दिसत होता आणि सगळा त्रास विसरायला होतंय.

Awesomelifejourney's avatar

By Awesomelifejourney

Tomorrow will be different than yesterday.

5 replies on “Local Inspiration#4 -आई…”

Leave a reply to Awesomelifejourney Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started