Categories
Uncategorized

नियती…

कस असते ना ज्यावेळी आपल्या कडे काहीच नसते ना त्यावेळी खरच आपले पण आपले नसतात. वेळ आपली तर सगळं आपले,नाहीतर सगळे असून पण नसल्यासारखे असतात.खर सांगायचं झालं ना तर वेळ ही सगळ्यांची येते फक्त कोणाची कधी लवकर येते तर कधी कोणाची उशिरा येते पण ज्यापण वेळी येते ना बाप बनून जाते राव!!

ज्यावेळी खरच म्हणजे आम्ही लहानच असू त्यावेळी म्हणावी अशी काही परिस्थिती छान नव्हते,म्हणजे आमच्यासाठी ती चांगलीच होती आणि आम्ही सगळे जण त्यात खुश होतो. आमचा आमच्या नशिबावर तेवढाच विश्वास होता जेवढा आमच्या आई बाबा च्या कष्टावर होता. हे ही दिवस निघून जातील या आशेवर आम्ही छान जीवन होतो. कोणाला कधी कळलंच नाही की स्वप्न आमच्या डोळ्यात आहे आणि हातात आमच्या ताकद आहे. म्हणजे अजून ही तो दिवस माझ्या आई च्या डोळ्यात पाणी आणून जातो. खूप लांबची नाही हो,जवळच्याच आमच्या आत्या, आमच्या शेजारून जायच्या पण आमच्या सोबत बोलयाच्या नाहीत. येताना खूप खाऊ घेऊन यायच्या पण आमच्या साठी नाही ,आमच्याच चुलत भावंडे यांच्यासाठी. आम्हाला त्याच काही कधीच वाटायचे नाही कारण आमच्या बापाने आम्हाला कधी काही कमी पडूच दिले नाही. खूप अवहेलना केली म्हणे आमची.आम्ही लहान होतो म्हूनन वेळेनुसार सगळं विसरून गेलो पण, ज्यांनी हे सोसले होते त्यांच्या मनात हे घर करून राहिले होते. कारण दिवस आमचे नव्हते.

आज बरेच दिवस झालेत,पण आता त्यांच्या डोळ्यात तिने दिलेल्या वागणुकीचा प्रचंड प्रमाणात राग तयार झालाय आता. रोज वाद नको म्हणून बोलन पण कमीच झालाय तिच्या विषयीच. आपली वेळ वाईट होती म्हणून ती अस वागली असं बाबा सांगत असतात आम्हाला,पण आता वेळ तिची वाईट आहे हे तिनेच सांगितले आम्हला.

काल फोन आला, बाबा कामात असल्याने नाही उचलला गेला त्यानच्या कडून,परत करायचं ते राहून च गेले. अगदी सहज च झाले सगळं. आई च्या फोन वर आला, आवाज थकून गेला होता,आता तिला भावाच्या घरी येण्याचं होतो. छान मजेत राहायचे होते. या दोघांच्या पण मनात राग होताच पण आज वेळ तिची वाईट आहे म्हून ते तिच्या सारखे नाही वागले. आधार दिला तिला,तुझंच घर आहे कधी पण ये ग! तू आल्यावर अजून रौनाक येईन बघ. तिचा आवाज जड झाला होता. जीव मोठा झाला होता. शब्द फुटेना झालते. लवकर येते म्हणले आणि फोन ठेवला. मागचे दिवस आठवुन सगळे शांत बसले होते.

कस असते ना,ज्यावेळी आपली वेळ खरच वाईट असते ना तेव्हा खरच कशाची अपेक्षा नसते ठेवायची. जवळची माणसे तर पाहिले आपले वैरी बनतात. पण ज्यावेळी आपली वेळ चांगली असते ना तेव्हा मात्र आपण मन मोठे ठेवायचं. कोणी आपल्यासोबत कस वागायचे हे आपण नाही ठरवू शकत आपण आपली वागणुक नक्कीच ठरवू शकतो ना! मनात राग राहण्यापेक्षा लोभ राहिलेला कधी पण चांगलंच की!

Categories
Uncategorized

निःशब्द…

प्रत्येकायच्या आयुष्यात असावं असं एक ठिकाण म्हणजे,जिथे सगळया चूका माफ असतात आणि समजून घेण्याची अपेक्षा असते.काय बोलू त्यांच्याबद्दल,कितीही काहीही बोललं ना तरी खरच आपणच चुकीचे ठरतोय.हे खरं आहे की आई बाबा झाल्याशिवाय त्यांचं सुख दुःख नाही कळत.

लहानपणी आपण नको त्या गोष्टींचा केलेला हट्ट असो किंवा दहा वेळा एकाच गोष्ट,अ अ अ करून विचारलेले असू देत. त्यांना त्याचा कधीच कंटाळा आलेला नसतो. किती ही कंटाळून आलेला बाबा आपल्याला अगदी हसत हसत समोर जातो , किंचित ही तो चिडलेला आहे किंवा खूप दमून आला आहे असं कधीच दाखवत नाही. आपल्याला आवडले गोष्ट कधी आपल्याला तो देतोय असं त्याला वाटत असते,तो फक्त आपल्या चेहऱ्यावरचा निर्मळ आनंद पाहण्याचा समाधान शोधत असतो. एक बाबा होणं म्हणजे सगळ्यात कठीण रोल आहे,हे त्यावेळी नाही समजत. जेव्हा तो रोल निभावतो ना तेव्हा त्या यातना कळतात. न कळत झालेल्या चूक पण खूप काही सांगून जातात.

आई बद्दल तर काय सांगणार असा सागर आहे तो जिथं माया प्रेम कधीच संपूच शकत नाही. केव्हा पण जावा तुम्ही वेळी अवेळी,रात्री अपरात्री जिथं तुम्हाला कधीच नाही शब्द ऐकायला मिळणार नाही. कितीही डोक्यात विचार असू देत खूप ताणतणाव असू दे पण तिच्या कुशीत गेले की रडून मोकळं होईल होते. खरच ,

आई विना स्वामी तिन्ही जगाचा खरच भिकारी आहे.

पण ना दिवस पुढे गेलेत आता,मागे वळून पाहिले तर केलेल्या चुकांची कबुली आहे फक्त. मागचे दिवस आठवले की असं वाटतं त्यावेळी का नाही काहीच कळाले.का एवढा मोठा अपराध केलेत की त्याची माफी मागण म्हणजे अजून मनात अपराधी पणा वाटू लागते. खरच कधी दिसलेच नाही , दिसण्यापेक्षा त्यांनी कधीच दाखवलं नाही आणि मी पण कधी त्याचा विचार च केला नाही.

काळजी होती ती,प्रेम होतं ते,आपल्या जीवाचा तुकडा ते सांभाळत होते ते. आपल्या पेक्ष्या जास्त काळजी त्यांनाच होती खरं तर पण आपल्याला ??

पण आपल्याला ला तर मैत्रीण हव्या होत्या,आणि कास आहे ना सगळ्यांचेच आई बाबा असेच असतात. खूप काळजी घेणारे पण असं कोणी सांगितले च नाही. मनावर हेच बिंबत गेले की आई बाबा खूप कडक असतात. कस वागायचो ना,फक्त चीड चीड अणि काही विचारलेच तर तस नसते ग आई आता असंच चालू ये. शाळा, कॉलेज, हे सगळं कुठे होत नाही तो पर्यंत आपले करिअर समोर असते. ते सेट होत नाही तो पर्यत आपले आयुष्य पण तर नव्याने चालू करायचे असते ना आपल्याला. या सगळ्यात आई बाबा सोबत असतात आपल्याला कशाची कमी पडू नये म्हणून,पण आपण कुठे असतो ज्यांनी आपल्याला सगळं दिले त्यांना आपण आपला साधा वेळ पण नाही देऊ शकलो. जाता जाता रडू येत खूप त्यातच ते समजून घेतात की कसं राहणार लेकरु आपले, सगळ्या व्यापातून कधी तरी दोन दिवस काढायचा आणि त्यांच्या नावे म्हणून येण्याचा खर की त्यांच्या साठी म्हणून त्यांचं ऐकुन घेतो का वो आपण परत आपलेच चालू होते. आणि कधी दोन दिवस संपतात,कळतं च नाही. असेच दिवसा मागून दिवस निघून जाते आणि आयुष्यही संपून जाते.

आपल्या मुलांचे आई बाबा होणं खरच खूप सोपं आहे वो पण आपल्याच आई बाबा चे मुलगा होणं आणि वेळे प्रसंगी त्याचा च आई बाबा होणं त्याहुन ही कठीण आहे.

या कोरोना मध्ये खूप मुलं आपल्या जन्मदात्याना भेटली. खरच सगळयांना देवाने दिलेला वेळ च होता की आता तरी काय तरी करा जे राहून गेलेय. जे फक्त आठवणी मध्ये आहे ते आता सत्यात येऊ द्या.

आई बाबा अस नात आहे खर ते अनुभवायला ना स्वतः आई बाबा झालं ना की खरच कळते.

.

Design a site like this with WordPress.com
Get started